ठेविले अनंते तैसेचि रहावे...
वयानुसार काही बदल स्विकारणे खरंच हितावर आहे का?
मिनलला टापटीप रहायची खूप आवड होती. रहावंच मुळी टापटीप. का म्हणुन गबाळं दिसावं?
मिनल कायम पंजाबी ड्रेसमध्ये असायची. घरातही तिने कधी गाऊन घालणं पसंत केलं नव्हतं. तिला वाटायचं की गाऊनमध्ये स्री गबाळी दिसते.
तिची टिकली अगदी ड्रेसला मॅचिंग असायची. चपला किंवा सॅन्डल व्यवस्थित असायच्या. तुटक्या कधीच नसायच्या.
तिच्या मिस्टरांना तिचा हा टापटीपपणा खूप आवडायचा.
एके दिवशी तिच्या जीवश्च कंठश्च मैत्रिणीसोबत तिने फिरायला जायचा प्लॅन केला.
छानपैकी केसांना कलप लावुन, लाईट कलरची लिपस्टिक लावुन, सुंदरसा ड्रेस घालुन दोघी तयार झाल्या.
मिनलची स्वतःची अॅक्टीवा होती. दोघी त्यावर ऐटीत स्वार झाल्या नि निघाल्या फिरायला. चाळीशीच्या असुनही विशीच्या वाटतील इतक्या छान दिसत होत्या.
दोन मुलांच्या आई असतील असं कुणालाच वाटणार नाही.
मिनल मस्त चालवत होती गाडी. सराव होता तिचा रोजचाच गाडी चालवण्याचा.
खाऊ खा, शाॅपिंग करा, गाणी गा, असं चाललं होतं दोघींचं.
तेवढ्यात दोन तरूण बाईकस्वार त्यांच्या जवळून गाडी चालवु लागले.
"हाय" असं बाईकस्वार म्हणाले.
दोघी चपापल्या.
"काय रे, कोण तुम्ही?" दोघींनी जरा कठोर स्वरातच विचारलं.
"आम्ही? आम्ही रोडरोमियो. चला एकत्र गंमतीजमती करूया."
" ए, चल हट. चालु पड इथुन. नाहीतर पोलिसांना बोलवेन."
"डार्लिंग, काय छान दिसतेयस. मालामाल."
"ए, आम्ही काय तुझ्या वयाच्या वाटलो का? तुझ्याएवढी पोरं आहेत आम्हाला. कानाखाली खेचेन चांगली. वय नाही बघत नि काय नाही. आले खेटायला. पेटवु का कानाखाली?"
"दिसताय तर आमच्या वयाच्या. साॅरी साॅरी मॅडम. गैरसमज झाला."
असं म्हणत त्या तरूणांनी बाईक सर्रकन पुढे नेली नि वेगात दूर निघुन गेले.
बापरे! सुटका झाली बाबा!
या तरूणांना अक्कलच नाही.
कुणाशीही जवळीक साधतात.
या रोडरोमियोंना चांगलं धुतलं पाहिजे.
अशा रितीने वाईट अनुभव आल्याने त्यांनी अजुन पुढे न जाता सरळ घरचा रस्ता गाठला. घरी आल्यावर त्यांनी घरच्यांना मानसिक त्रास नको म्हणुन घडलेला किस्सा सांगितलाच नाही.
पण जेव्हा अंतर्मुख होवुन विचार केला तेव्हा त्यांना असं जाणवलं की खरंच लाईफ एन्जाॅय करण्यासाठी केसांना कलप लावण्याची गरज आहे का?
निदान या पांढर्या केसांमुळे तरूण मुले वचकुन रिस्पेक्ट देतात. दूर राहतात. लगट करत नाहीत. एका अर्थी बाईला या पांढर्या केसांमुळे सुरक्षितता मिळते. वाईट नजरा बंद होतात. शिवाय सभ्य लोक तर आहेतच रिस्पेट द्यायला. सभ्य लोकांना फरक पडत नसतो तुमच्या पांढर्या किंवा काळ्या केसांनी. ते मुळातच नीट असतात.
दोघींनी ठरवलं की यापुढे लाईफ खूप एन्जाॅय करायचं पण पांढर्या केसांची लाज न बाळगता. केसांना कलप न लावता.
त्यामुळे वाईट नजरा बंद होऊन आपण अधिक आनंदी राहू शकू. सुरक्षित राहू शकू.